OUR TEAM
समर्थ रघुवीर ...
समर्थ रघुवीर सहकारी पतसंस्थेची स्थापणा १६ डिसेम्बर १९८७ संस्थापक मा. श्री. रघुनाथ चव्हाण यांनी ५१० सभासद व १४,००० भाग भांडवल जमा करून केली सुरुवातीच्या वेळी कार्यलय उघडणेसाठी कोणतीही पक्की जागा नव्हती म्हणून राहत्या घरातचं एक टेबल खुर्ची टाकुन पतसंस्थेच्या कामकाजास दि. ०७ जानेवारी १९८८ रोजी सुरुवात केली .
मुंबईतील 'आर ' वार्डातून सुरु झालेला संस्थेचा प्रवास गेली ३८ वर्षे अविरत चालू आहे व संस्था महाराष्ट्रात संस्थेची पश्चिम उपनगरामध्ये व ठाणे जिल्यात ३ शाखांचा कारभार समर्थपणे सांभाळतात जातो आहे . संस्था ज्यांच्या बळावर सुरळीत कार्य करते ते आमचे २१ कर्मचारी व ७ दैनंदिन ठेव प्रतिनिधी, तीच संस्थेची अमुल्य ठेव आहे. संस्थेचे सभासद, संचालक, कर्मचारी आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींना नेहमीच नवनवीन प्रकारे अद्ययावत ट्रेनिंग दिले जाते ज्यामुळे संस्थेच्या सेवेचा दर्जा अधिकाधिक चांगला होतो. पतसंस्थेस गेली ३८ वर्षे ऑडीट वर्ग अ मिळाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. देशात आलेल्या विविध आपत्तीप्रसंगी संस्थेने सढळहस्ते आर्थिक मदत केली आहे. आदिवासी विभागात वैद्यकीय सेवा दिली जाते. वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने शाळांना आर्थिक मदत, विद्यार्थी दत्तक योजना व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी, महिला बचत गटांसाठी विशेष सहकार्य केलं आहे. त्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र राज्य शासनानेही संस्थेस पुरस्कार देऊन गौरवले आहे. सन २०१३ सालाचा सहकार निष्ठ पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने समर्थ रघुवीर गौरव केला आहे. तसेच ४ वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करून संस्थेला गौरवले आहे. अन्य संस्था ,फेडरेशनचे संस्थाचे १५ पुरस्कार मिळालेले आहेत.

38
Years
Experience
Number
3
of Branches
A
Audit
Class
4
Experienced
Partners
BOARD OF DIRECTORS

Raghunath.B.Chavan
Founder-Chairman